Posts

अंधारलेला प्रकाश

संदर्भ :            ' वृद्धाश्रम ' म्हटलं की ' टाकले ' हा शब्द एकावर एक फ्री असावा इतक्या सहजतेने येतो. खरंतर वृद्धाश्रम ही संकल्पना प्रत्यक्षात चुकीची की बरोबर हा एक मोठा भ्रम निर्माण करणारा प्रश्न आहे. उभं आयुष्य मुलांसाठी प्रकाश देणाऱ्या जन्मदात्यांना एका अभावनिक अंधारात ठेवने किंवा टाकने हे कितपत योग्य आहे, ही समाजात पसरलेली लाचारी की संस्कारांची कायापालट अथवा नाशवंत झालेली संस्कृती........ ःं हसण्याचं आणि खंत करण्याच कारण एवढचं की संस्कृती म्हणजे काय ? हा प्रश्न आजच्या पिढीला विचारला तर 150% उत्तरं ही उडवाउडवीचीच मिळणार हे मात्र नक्की.......          हा प्रश्न_उत्तर खरंतर 21 व्या शतकातील आधुनिकीकरणामुळे की संपत चाललेल्या माणूसकीच्या नीतिमत्ते मुळे निर्माण होताय ? वयाच्या 60 वर्षापर्यंत मुलांसाठी गुडघ्याच पाणी होई पर्यन्त काळजी करणार्‍या, कष्ट करणार्‍या, राबणार्‍या त्या आई-बापाला एका अभावनिक एकांत अंधारात ढकलने हा निव्वळ एक मुर्खपणा आहे असं मला वाटतं.....           अन् अशाच एका अंधारलेल्या वृद्धाश्र...

आत्मसंघर्ष

'आयुष्य' आणि आयुष्याचा प्रश्न आजच्या प्रत्येक युवकास भेडसावत आहे. खरं तर आयुष्य आपल्याला खूप काही देऊन जात असतं पण ते समजून घेण्यासाठी दूरदृष्टी आपल्याकडे नसते कारण आजचा नवयुवक  स्वप्न - ध्येय - जीवन - भविष्य या चार शब्द रचनेतच आयुष्य संपवतो, अन त्यातही अपयशी ठरला की ' आत्महत्या '. अशा युवकाला आधाराची ,        स्व-विकासाची आणि आत्मविश्वासाची जाणीव करून देणारा हा माझा हृदय प्रयत्न............                             आत्मसंघर्ष आयुष्याची प्रश्न माहित नसतात, ती अलगद आयुष्यात येत असतात, अशा प्रश्नांची उत्तरं देऊन तरं बघं, थोडं हसुन, थोडं रडून, थोडं लढून तर बघं.... आयुष्याच्या अडचणी खूप असतात, आयुष्याची प्रश्न त्याचं देत असतात, अशा अडचणींवर मात करून तर बघं, थोडं हसुन, थोडं रडून, थोडं लढून तर बघं.... आयुष्य तर दगडासारखचं असतं, शांत ,  स्तब्ध ,  कठोर स्वभावाचं, अशा दगडाला छेदणारी संथ धार होऊन तर बघं, थोडं हसुन, थोडं रडून, थोडं लढून तर बघं.... आयुष्यात दुःख येतच...