आत्मसंघर्ष
'आयुष्य' आणि आयुष्याचा प्रश्न आजच्या प्रत्येक युवकास भेडसावत आहे. खरं तर आयुष्य आपल्याला खूप काही देऊन जात असतं पण ते समजून घेण्यासाठी दूरदृष्टी आपल्याकडे नसते कारण आजचा नवयुवक स्वप्न - ध्येय - जीवन - भविष्य या चार शब्द रचनेतच आयुष्य संपवतो, अन त्यातही अपयशी ठरला की ' आत्महत्या '. अशा युवकाला आधाराची , स्व-विकासाची आणि आत्मविश्वासाची जाणीव करून देणारा हा माझा हृदय प्रयत्न............ आत्मसंघर्ष आयुष्याची प्रश्न माहित नसतात, ती अलगद आयुष्यात येत असतात, अशा प्रश्नांची उत्तरं देऊन तरं बघं, थोडं हसुन, थोडं रडून, थोडं लढून तर बघं.... आयुष्याच्या अडचणी खूप असतात, आयुष्याची प्रश्न त्याचं देत असतात, अशा अडचणींवर मात करून तर बघं, थोडं हसुन, थोडं रडून, थोडं लढून तर बघं.... आयुष्य तर दगडासारखचं असतं, शांत , स्तब्ध , कठोर स्वभावाचं, अशा दगडाला छेदणारी संथ धार होऊन तर बघं, थोडं हसुन, थोडं रडून, थोडं लढून तर बघं.... आयुष्यात दुःख येतच...