अंधारलेला प्रकाश
संदर्भ :
' वृद्धाश्रम ' म्हटलं की ' टाकले ' हा शब्द एकावर एक फ्री असावा इतक्या सहजतेने येतो. खरंतर वृद्धाश्रम ही संकल्पना प्रत्यक्षात चुकीची की बरोबर हा एक मोठा भ्रम निर्माण करणारा प्रश्न आहे.
उभं आयुष्य मुलांसाठी प्रकाश देणाऱ्या जन्मदात्यांना एका अभावनिक अंधारात ठेवने किंवा टाकने हे कितपत योग्य आहे, ही समाजात पसरलेली लाचारी की संस्कारांची कायापालट अथवा नाशवंत झालेली संस्कृती........
ःं हसण्याचं आणि खंत करण्याच कारण एवढचं की संस्कृती म्हणजे काय ? हा प्रश्न आजच्या पिढीला विचारला तर 150% उत्तरं ही उडवाउडवीचीच मिळणार हे मात्र नक्की.......
हा प्रश्न_उत्तर खरंतर 21 व्या शतकातील आधुनिकीकरणामुळे की संपत चाललेल्या माणूसकीच्या नीतिमत्ते मुळे निर्माण होताय ?
वयाच्या 60 वर्षापर्यंत मुलांसाठी गुडघ्याच पाणी होई पर्यन्त काळजी करणार्या, कष्ट करणार्या, राबणार्या त्या आई-बापाला एका अभावनिक एकांत अंधारात ढकलने हा निव्वळ एक मुर्खपणा आहे असं मला वाटतं.....
अन् अशाच एका अंधारलेल्या वृद्धाश्रमाला भेट देताना अनुभवलायं तो एकांत, राम असुनही प्राण गेलेलं शरीर , ते शब्द अन् ती आत्मव्यथा......
_ नचिकेत आदमाने.
अंधारलेला प्रकाश
एक बंद झोपडी अन् तो अंधारलेला प्रकाश.........
पावलांची चाहूल
अन् ती काटेरी वाट,
सावल्यांचा खेळ जणू
पाण्याची लाट.......
एक बंद झोपडी अन् तो अंधारलेला प्रकाश.........
कुजबूजणारे किडे
अन् तो कर्कश त्राण,
शांत झालेलो मी
जणू सरणावरचा प्राण.......
एक बंद झोपडी अन् तो अंधारलेला प्रकाश.........
नाश झालेली रात्र
अन् ती पावसाची धार ,
एकांत झालेलं शरिर
अन् तो दाटलेला अंधार.
एक बंद झोपडी अन् तो अंधारलेला प्रकाश.........
-- @nachiket_adamane
Some shamless Youth only pretending them self as responsible citizens & now it is our responsibility to highlight them and Comeuppance by 'kanmantra'.
ReplyDelete